Miss India World चा मुकुट डोक्यावर येईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.. । Nandini Gupta
मुलगी मॉडेलिंग करते असं कोणते आई-वडील अभिमानाने सांगतात का? मला तर वाटतं नाही, आजही या क्षेत्राकडे व इथे काम करणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही. पण बदल घडतोय.. करियर म्हणून मुली याकडे पाहतायत, पण आजही ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण यामध्ये फार कमी आहे. असं का? तर असं म्हंटल जात मॉडेलिंग हे पैसेवाल्या पोरींची कामं आहे. बरोबर ना? पण असं काही नसत ओ.., तुमच्यात टॅलेंट असेल आणि मनात जिद्द असेल तर संपलं.., शाहरुख खानाचा तो डायलॉग आठवतो की नाही, कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.. अगदी या डायलॉग प्रमाणेच शेतकऱ्याची मुलगी असलेल्या नंदिनीने करून दाखवलंय.., नंदिनी गुप्ताने मिस इंडिया वर्ल्ड-2023 चा ताज जिंकला आहे.. कसा होता तिचा प्रवास चालतर मग पाहुयात...
नंदिनी गुप्ताने मिस इंडिया वर्ल्ड-2023 चा ताज जिंकला आहे. ती 19 वर्षांची असून ती राजस्थानमधील कोटा येथील आहे. मणिपूरच्या इम्फाळ येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका कार्यक्रमात गेल्या वर्षीची मिस इंडिया सिनी शेट्टीने नंदिनीचा मुकुट घातला. आता नंदिनी मिस वर्ल्ड-2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नंदिनी सध्या मुंबईतील एका कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंट करत आहे.
या कार्यक्रमात नंदिनी म्हणाली - ओळख निर्माण करण्यासाठी कधी-कधी अपयशही आवश्यक असते. करिअर किंवा आयुष्याचा विचार करताना सर्व अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन पुढे जा. ध्येय साध्य करण्यासाठी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी पुढे जा. अपयश आले तर त्यातून शिकून पुढे जा.
लहानपणापासूनच मॉडेल बनण्याची इच्छा..
नंदिनीचे वडील सुमित गुप्ता सांगतात, 'नंदिनीला लहानपणापासूनच मॉडेलिंग करण्याची इच्छा होती. जेव्हा ती टीव्हीवर शो पाहायची तेव्हा ती मॉडेल्ससारखी वागायची. तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून घरीच कॅटवॉक करायला सुरुवात केली, मेकअप करायला सुरुवात केली. त्यानंतर 9वीत असताना तिने मॉडेलिंगमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. मॉडेलिंगबाबत तिच्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेतले गेले नाही.
वडील शेती करतात..
नंदिनीचे वडील सुमित गुप्ता हे शेतकरी आहेत. कोटा येथील सांगोडजवळील भांडहेडा येथे ते शेती करतात. हे कुटुंब कोटाच्या जुन्या सब्जी मंडी भागात राहते. नंदिनीची आई गृहिणी असून धाकटी बहीण सध्या नववीची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा जो गैरसमज असतो की बरीब घरातील मुलगी मॉडेलिंग क्षेत्रात आपलं करियर करू शकत नाही त्यांना नंदिनी उत्तम उदाहरण आहे..