नांदेड हादरले,खोट्या प्रतिष्ठेपायी आई वडिलांनीच घेतला पोटच्या मुलीचा जीव

नांदेड जिल्ह्यातील एका गावात खोट्या समाज प्रतिष्ठेपोटी आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा विळ्याने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय.;

Update: 2024-02-04 10:28 GMT

नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा समाज प्रतिष्ठेसाठी निर्घुण खून केल्याची घटना घडली होती. आणखी एका ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.नांदेड जिल्ह्यातील एका गावात खोट्या समाज प्रतिष्ठेपोटी आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा विळ्याने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. याबाबत आईबापावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या कुटुंबातील मुलीचे प्रेम परिसरातील एका इतर धर्मीय युवकाशी होते, हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीस समजाऊन सांगून इतर धर्माच्या मुलासोबत प्रेम करण चुकीचे आहे अशी समज दिली होती.पण घरून टोकाचा विरोध झाल्याने सदर तरुणी मागील महिन्याभरापूर्वी प्रेम आसणाऱ्या तरुणासोबत पळून गेली होती. त्यानंतर घरच्यांनी पळून नेणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देत, सदर युवकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीला समजुत देत,आई वडिलांच्या स्वाधीन केले होते. परंतु त्यानंतरही सदर तरुणी त्या तरुणाशी लग्न करण्याचा विचार सोडण्यास तयार नव्हती. आणि त्याच मुलासोबत लग्न करतो असा अट्टहास करत होती.

आणि मुलीच्या या अट्टाहासातुनच खोट्या आत्मप्रतीष्ठेची ठिणगी मुलीच्या आई-वडिलांच्या मनात पडली. ज्यात मुलीने दुसऱ्या समाजातील तरुणाशी लग्न केले तर आपली बदनामी होईल या बेगडी प्रतीष्ठेच्या कारनामुळे टोकाचे पाऊल उचलत पोटच्या गोळ्याला क्रूरपणे संपवले आहे.खोट्या इभ्रतीने पेटून उठलेल्या आई वडिलांनी त्यांची मुलगी शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असतांना विळ्याने सपासप डोक्यावर, कपाळावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करत मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात दखल केला. पण ही आत्महत्या नसून खून असल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आल्या नंतर मुलींच्या आई वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या.हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मुलीच्या खून प्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेतले असुन कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने विषयी अप्पर पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरातील नेहरूनगर येथिल 17 वर्षीय तरुणीचे तेथीलच मुस्लिम समाजातील युवकाशी प्रेम संबंध जुळले.पण या प्रेम संबंधाची कानकुण तिच्या आई वडिलांच्या कानावर गेली. सदर तरुणीच्या आई वडिलांना मुलीचे इतर समाजातील तरुणाशी असलेले प्रेम संबंध मान्य नव्हते. या दांपत्याने या प्रेम संबंधास तीव्र विरोध केला. त्यामूळे एक दिवस ही मुलगी त्या युवका सोबत घरातून पळून गेली. मुलगी अल्पवयीन असल्याने सदर तरुणा विरोधात हिमायतनगर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. इतके घडूनही मुलगी ऐकायला तयार नाही म्हटल्यावर आई वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Tags:    

Similar News