32 शिराळात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी होणार..

करोनामुळे गर्दी आणि पर्यावरणाच्या काळजीतून जिवंत नागपूजा रोखण्यासाठी 'ड्रोन कॅमेऱ्या'द्बारे वन विभागाची नजर;

Update: 2021-08-13 02:07 GMT

बत्तीस शिराळा येथील नागपंचमी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. नागपंचमी दिवशी घरातील महिला जिवंत नागाची पूजा करण्याची इथे परंपरा आहे. माञ जिवंत नागाची पूजा करण्याबाबत सध्या उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे सद्या इथे नागपंचमी (Nagpanchami) दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. पण आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवर करोनामुळे गर्दी आणि पर्यावरणाच्या काळजीतून जिवंत नागपूजा रोखण्यासाठी 'ड्रोन कॅमेऱ्या'द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे.

शिराळा (32 shirala) व परिसरात कुठेही सापांची हाताळणी अथवा प्रदर्शन होणार नाही यासाठी वन विभागाने मागील चार दिवस जनजागृती केली असून नागपंचमीवेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी वन कर्मचारी, पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

वन विभागाची सहा फिरती आणि दहा गस्ती पथके तैनात करण्यात आली असून दोन ड्रोन कॅमेऱ्याद्बारे संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच ६ व्हिडिओ कॅमेरे, एक श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे चार सहायक वनरक्षक दर्जाचे चार अधिकारी, वनक्षेत्रपाल १८, वनपाल ३० , वनरक्षक ५० असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून वन विभागाच्या मदतीला पोलिस देखील तैनात करण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News