"महाराष्ट्रात राहत असल्याचा आम्हाला अभिमान", मिरजेत हिजाब घालून मुस्लिम महिलांची शिवरायांना मानवंदना!

Update: 2022-02-20 08:41 GMT

राज्यभरात सर्वत्र काल तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या दरम्यान सांगलीतील मिरज येथे हिजाब परिधान करून मुस्लिम महिलांनी शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून या महिलांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला सामाजिक कार्यकर्त्या सुमय्या वसीम रोहिले, आफ्रीन निसार रोहिले, शहनाज मुल्ला, तबस्सुम रोहिले, नाजो शिलेदार या मुस्लिम भगिनींचे शिवप्रेमी हिंदू बांधवांनी स्वागत करून त्यांचा सन्मान केला.

कर्नाटक राज्यात सध्या हिजाब वरून सुरू असलेल्या राजकारणावर मुस्लिम भगिनींनी नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांचा आदर केला जात होता आणि महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लीम हे भेद कधीच नव्हते. त्याचबरोबर कर्नाटकात बहुचर्चित असलेल्या हिजाब प्रकरणावर टिपणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो याचा अभिमान असल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News