सरकारने नियमावली तयार करण्याची वाहनचालकांची मागणी. एकीकडे पेट्रोलचे दर दिवसागणिक वाढत असतानाच आता सीएनजीच्या दरात देखील झपाट्याने वाढ होऊ लागल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. काल मध्यरात्री पासून मध्य रात्री पासून सीएनजीच्या किमतीत 4 रुपयाने वाढ झाल्याने 72 रुपयांचे एक किलो सीएनजीची किम्मत 76 रुपयांवर गेली असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. किमान सीएनजी चे दर तरी नियंत्रणात असावेत सर्वसामान्यांना परवडणारे ठेवावेत त्याच्यासाठी नियमावली तयार केली जावी अशी मागणी त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे.