७५ दिवस उलटूनही कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल टांगणीला..
मुंबई विद्यापीठातील गोंधळाचा फटका विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बसला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागातील एलएलबी आणि बीएलएस अभ्यासक्रमाचे निकाल ७५ दिवस उलटूनही अद्याप जाहीर झालेले नाहीत. परीक्षा होऊन अडीच महिने उलटले तरी अनेक विधी संस्थांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण केलेले नाही. 5000 हून अधिक उत्तरपत्रिकांचे अद्याप पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.

दरम्यान ४५ दिवसात अपेक्षित असलेला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल ७५ दिवस उलटले तरीही लागला नाही. त्यामुळेच कायद्याच प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या सत्राच्या केल्या जाणाऱ्या नियोजनवर परिणाम होणार. २९ नोव्हेंबरला विधी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा सुरू होऊन ७ डिसेंबर ला संपली परंतु अजूनही परीक्षेचा निकाल लागला नाही. सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील विधी शाळांवर मुंबई विद्यापीठ देखरेख करते. तीन वर्षांचा कायदा पदवीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी विद्यापीठातर्फे उपलब्ध आहे.
वकील होण्यासाठी, उमेदवारांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, जी दर सप्टेंबरमध्ये दिली जाते. पुढील अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ही निकालपत्रिका असणे आवश्यक आहे. पण निकल पत्रिका जाहीर न झाल्याने विद्यार्थी संतप्त आहेत. "डिसेंबरमधील परीक्षेचे निकाल अद्याप उपलब्ध नाहीत." अजूनही अनेक उत्तरपत्रिका जमा करायच्या आहेत. विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे निकालाला उशीर झाला हे खेदजनक आहे.