मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांविरोधात महापौर किशोरी पेडणेकर आणि काही नगरसेवकांचे आंदोलन करत आहेत. महापालिकेत प्रभाग समितीची निवडणुक आज होणार होती मात्र अशा महत्वाच्या वेळीही प्रशासनाचे अधिकारी गैरहजर असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही नगरसेवकांनी महापौर दालनात ठीय्या आंदोल सुरू केलं आहे.
सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहील्यामुळे प्रभाग समितीची निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हे अधिकारी का गैरहजर राहिले, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, विरोधकांना याप्रकरणी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौर किती हतबल आहेत, त्यांना त्यांचेच अधिकारी निवडणुकीसाठी हजर न राहिल्याने आज त्यांच्याच दालनासमोर ठिय्या आंदोलन करावे लागले, हा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक की त्यांच्या कर्माची फळे, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.