मुंबईला गती देणाऱ्या मेट्रो ७ आणि २ अ या चालक रहीत मेट्रो रेल्वेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

Update: 2021-01-29 11:30 GMT

गेल्या ६ वर्षांपासून सुरू असलेल्या मेट्रो ७ दहिसर पुर्व ते अंधेरी पुर्व आणि मेट्रो २ अ दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या चालक रहित मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्यात पोहोचलं आहे. लवकर या मार्गावर मेट्रो लोकल धावणार असून मुंबईकरांना रोजच्या ट्रॅफिक पासून मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मार्गावर धावणाऱ्या मेट्रोची कमान ही महिलांच्या हाती असणार आहे. मेट्रो स्टेशन कंट्रोलर आणि ऑपरेटर म्हणून ७ महिला या मेट्रोची धुरा सांभाळणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ४:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते यांच्या हस्ते या मेट्रो लोकलच्या कोचचं लोकार्पण करण्यात आले आहे.

मेट्रो २0 अ आणि मेट्रो ७ प्रकल्प या मार्गावर चालकरहित मेट्रो बंगळुरू येथील आहे. बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडून (बीईएमएल) स्वदेशी बनावटीच्या मेट्रो आहे. मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर त्यांची चाचणी होईल. त्यानंतर येत्या मे-२०२१ पासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल करण्याचं महाविकास आघाडी सरकारचं नियोजन आहे. हे काम निर्धारित वेळेत होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

प्रत्येक कोचसाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च आला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे ही कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या परदेशी मेट्रोपेक्षा सरकारला किफायतशीर ठरलेली आहे, असा दावा या प्रोजेक्ट हाताळणाऱ्या एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकांसाठी ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. प्रत्येक ट्रेन ही ६ कोचची असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात सुमारे ३८० जणांना प्रवास करणं शक्य आहे.


या एका ट्रेनची प्रवासी क्षमता २ हजार २८० इतकी आहे. या मेट्रो मार्गिकेवर प्रत्येक ट्रेनची कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास असेल. चालकरहीत (अन अटेंडेड ट्रेन ऑपरेशन) मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे. मात्र प्रवाशांना असुरक्षित वाटू नये, यासाठी सुरुवातीला मोटरमनसह या ट्रेन धावणार आहेत, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

निसर्गाच्या दृष्टीने मेट्रो ७ आणि २ ए फायदेशिर...

मेट्रो ७ आणि २ अ मुळे लोकांना ट्रॅफिकपासून मुक्तीतर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर वाहतूकीमुळे होणारं प्रदुषण देखील थांबणार आहे. या मेट्रो मार्गामुळे उपनगरातील लोकांना जलद प्रवास करता येणार असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे धुळ आणि पावसामुळे सतत रस्त्यावर पडणाऱ्या खड्यांमुळे होणारा त्रासही कमी होणार आहे.

Tags:    

Similar News