Mumbai: टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या

Update: 2021-09-13 04:00 GMT

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे पुन्ह एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक वाढल्याचे दिसत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे दाखल झाले आहेत.

Tv9 मराठीने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत जानेवारी ते जुलै या सात महिन्यात विनयभंगाचे सुमारे 1100 गुन्ह्यांची नोंद झाली आहेत तर, बलात्काराचे 550 गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यादरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. त्यातील 299 घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. यंदा गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील 445 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचे गुन्हेही वाढले आहेत.

गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत विनयभंगाचे 985 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदा 1100 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. 2020 मध्ये पूर्ण वर्षात मुंबईत बलात्काराच्या 767 घटना घडल्या, तर विनयभंगाचे 1945 गुन्हे दाखल झाले होते.

Tags:    

Similar News