''तर हे असे आहे'' म्हणत संजय राऊतांनी केला नवनीत राणांच्या खोट्या जात प्रमाणपत्राचा पर्दाफाश..

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या खा. नवनीत राणांवर राऊतांनी दुसरा बॉम्ब टाकत राणांच्या खोट्या जात प्रमाणपत्राचा पर्दाफाश केला आहे.

Update: 2022-04-28 08:34 GMT

सध्या अटकेत असलेल्या खा. नवनीत राणांनी नागपूर पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊत यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. "मी मागासवर्गीय असल्याने आकसापोटी संजय राऊत वारंवार माझा अपमान करत आहेत. मला हिणवून बोलत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत कारवाई करावी", असं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे. आणखी एक पत्र त्यांनी दिल्ली पोलिसांनाही दिले आहे.

नवनीत राणा यांनी 2014 मध्येही बोईसर महापालिका शाळेतून वडील हरभजनसिंग कुंडलेस यांचं जात प्रमाणपत्र मिळवलं होतं. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे जात पडताळणी करून निवडणूक लढवली. मात्र त्यांचं हे प्रमाणपत्र 2015 मध्ये कोर्टानं अवैध ठरवलं.2017 मध्ये नवनीत राणा यांनी आजोबांचं जात प्रमाणपत्र बनवून घेतलं. त्याच आधारावर जात वैधता समितीनं 3 नोव्हेंबर 2017 ला राणा यांना वैधता प्रमाणपत्र दिलं.

पण नवनीत राणांची जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रांचा कसून तपास केला असता ती खोटी असल्याचं आम्हाला दिसलं. त्यावर आक्षेपही घेतला. मात्र जात पडताळणी समितीला मॅनेज करून राणांनी स्वतःचं प्रमाणपत्र वैध करवून घेतल्याचा आरोप यापू्र्वी झाला होता.

या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कागदपत्रं नवनीत राणांनी ट्विटवरुन टाकली आहेत.

हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करतानाच त्यांना 2 लाखाचा दंड ठोठावला. तसंच पुढच्या 6 आठवड्यांत जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही दिले होते. नवनीत राणा यांनी फसवणूक करून आणि बनावट कागदपत्रं सादर करून जात प्रमाणपत्र मिळवल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवला आहे. या प्रकरणी नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती घेतल्यानं त्यांची अमरावती (एससी राखीव) मतदारसंघातील खासदारकी कायम आहे.

Tags:    

Similar News