खासदार नवनीत राणा यांची खोटं जात प्रमाणपत्र सादर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय

या आधिही मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोशी ठरवंल आहे.

Update: 2021-06-08 09:47 GMT

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई हायकोर्टाकडून धक्का बसला आहे. कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता राणा यांचे लोकसभेचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. अमरावती लोकसभा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. नवनीत कौर राणा यांनी बनावट प्रमाणपत्रे बनवून निवडणुक जिंकल्याचा आरोप अडसूळ यांनी केला होता.

सदर प्रकरणात राणा दोशी आढळल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाखांचा दंड व सहा आठवड्यांत बनावट प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे झालं आत्ताचं. पण, बनावट प्रमाणपत्र सादर करुन निवडणूक लढवण्याची नवनीत यांची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणूकीतही त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केलं होतं. त्यावेळी देखील मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोशी ठरवलं होतं.

त्यावेळी नवनीत राणा यांनी वडिलांची 3 बनावट शाळा सोडल्याचे दाखले तयार करुन नवनीत कौर हरभजनसिंह कुंडलेस या नावाने जात प्रमाणपत्र मिळवलं होतं. पण 2014 ची लोकसभा निवडणूक त्या हरल्या.

Tags:    

Similar News