मायीचा हात गालावरून फिरला कि... पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंची भावुक पोस्ट
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण काय खोटी नाही. आई हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आईशिवाय आयुष्य नावाच्या पुस्तकाचं पाण पुढे लिहिलचं जाऊ शकतं नाही. क्वचितच लोकं असे असतात ज्यांना त्यांची आई बालवयात सोडून गेली आहे, काही लोकं असेही असतात जे ऐनउम्मेदीच्या काळात आईलाच्या प्रेमाला मायेला मुकतात. आईचं महत्व तिचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे, हे आपल्याला प्रसिद्ध डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाणे यांच्या फेसबूक पोस्ट मधून कळेल.
डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या आई आजारी होत्या, अगोदर कमरेचे हाड मोडले होते. ते दुरूस्त झाले व त्यानंतर उजव्या हाताचे हाड मोडल्याने त्यांच्या दोन्ही हाडांचे ऑपरेशन झाले आहे. दरम्यान तात्याराव आईला लातूरला भेटायला गेले होते. दरम्यान, डॉक्टर तात्याराव लहाणे यांची ही फेसबूक पोस्ट काही ओळींची जरी असली तरी आजच्या तरुणाईसाठी एकंदरीत आई विश्वासाठी महत्वपूर्ण आणि प्रेयरणादायी पोस्ट आहे.
ज्यात डॉक्टर तात्यारावांनी मित्रहो नमस्कार. म्हणत सुरुवात केली आहे. ते म्हणतात "कालच मायीला भेटण्यासाठी लातुरला गेलो होतो. मायीचे अगोदर कमरेचे हाड मोडले होते. ते दुरूस्त झाले व त्यानंतर उजव्या हाताचे हाड मोडले होते. पण या वयातही मायीची ईच्छाशक्ती अतिशय दांडगी असल्याने दोन्ही हाडे आता १००% जुडली आहेत". अशी माहिती तात्याराव लहाणे यांनी दिली आहे. तात्याराव लहाणे आईची जिद्द आणि आईचा उत्साह या संदर्भात सांगतांना पुढे ते म्हणतात "मायीची उत्साह, चेहऱ्यावरील हसू व आमच्यावरील प्रेम यात काहीच कमी झाले नाही. मायीने आजही आमच्या सर्व कुटुंबाला एकत्र घट्ट बांधुन ठेवले आहे. डॅा. विठ्ठल , डॅा. कल्पना, डॅा. प्रसाद व गया ( माझी भावजयी) यांनी मायीची या काळात खुपच काळजी घेतली".
असं सांगत आई एखाद्या कुटुंबात असणं किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न तात्याराव करतात. त्यांच्या फेसबूक पोस्ट मध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोंकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या माय लेकरांमध्ये किती जिव्हाळा आणि प्रेमाचं नातं आहे. तात्याराव लिहितात "मायीचा हात गालावरून फिरला कि थकवा पळून जातो व काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. अंथरूनावर असुनही काल म्हणत होती मी तुला खायला पुरणाच्या पोळ्या करते. किती हे प्रेम. मायीचे आशिर्वाद घेउन मुंबईकडे रवाना झालो", असं लिहितात. आणि शेवटी या फेकबूक पोस्टमध्ये मायीला १०१ वर्षाचे निरोगी आयुष्य मिळावे यासाठी देवाकडे प्रार्थणा करतात.