आईचा पहिला विमान प्रवास! डॉ. अमोल कोल्हे यांची भावनिक पोस्ट...
जिने भरारीचं स्वप्न डोळ्यांत पेरलं.. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा आनंद शब्दांत न सांगता येणारा;
खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक वर आईच्या पहिल्या विमान प्रवासा विषयी एक पोस्ट शेअर करत आईसोबतचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. आईच्या पहिल्या विमान प्रवास त्यांच्यासाठी कसा आनंददायी होता हे त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले आहे. समाजमाध्यमांवर देखील अनेक लोक या पोस्टवर लाईक्स व कॉमेंट्स करत आहेत.
काय लिहिलं आहे अमोल कोल्हे यांनी...
आईचा पहिला विमान प्रवास!
अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु सासर-माहेर एकाच गावात, नातेवाईक सु द्धा जवळपासच्या गावात किंवा शहरात त्यामुळे विमानप्रवासाची कधी वेळच आली नाही.. बरं, आधी वडिलांची शेती, मुलांच्या (आमच्या)परीक्षा या सगळ्या प्रापंचिक व्यापातून खास विमानाने फिरायला जाणं ही आम्हा मध्यमवर्गासाठी चैनच! आज तिच्यापेक्षा आम्हीच जास्त excited होतो. जिने हातांच्या हिंदोळ्यावर झुलवलं, कागदाचं विमान करायला शिकवलं इतकंच नाही तर भरारीचं स्वप्न डोळ्यांत पेरलं.. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा आनंद शब्दांत न सांगता येणारा!!!