राणा दांपत्य vs शिवसेनेच्या भांडणात मनसेची उडी, मग काय लोकांनी संपलेल्या पक्षाची आठवण करून दिली

Update: 2022-04-24 07:55 GMT

गेल्या दोन दिवसांपासून राणा दांपत्य विरूद शिवसेना असा संघर्ष सुरू होता. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील उडी मारली. मनसेच्या संतोष धुरींनी एक ट्विट केलं आणि त्याव प्रतिक्रीयांचा पाऊस पडला. त्यात अनेकांनी मनसेला संपलेल्या पक्षाची उपमा देत त्यांची खिल्ली उडवल्याचे पहायला मिळाले.

शुक्रवारी सुरू झालेल्या हनुमान चालिसा नाट्यावर शनिवारी संध्याकाळी पडदा पडला. मुंबई पोलिसांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानावरून अटक केली. या दोन दिवसांदरम्यान शिवसेनेच्या अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदारांपर्यंत सगळेच रस्त्यावर उतरले होते. काहींनी तर राणा दांपत्यांसाठी एँब्युलन्सदेखील बुक करून ठेवली होती. त्यांच्या या सगळ्या राड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्षात काही सहभागी झाली नसली तरी हे हनुमान चालिसा प्रकरण त्यांनीच सुरू केलं होतं. त्यामुळे ते यावर व्यक्त नसते झाले तरच नवल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील पदाधिकारी संतोष धुरी यांनी ट्विटरला एक ट्विट केलं. त्या ट्विट मध्ये ते म्हणतायत, "अरेरे,वो दो और तुम्हारे हजारो बहुत ना इन्साफी है |"

त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. ओम नरवाडे म्हणतात, "मग त्या बंटी - बबली ला सांगा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते घेऊन यायला!! काय म्हणता संपलेल्या पक्षाचे कार्यकर्ते फक्त ट्विटर वार बोंब मारत फिरतात!!"

यावर विनोद विजय शिगवण यांनी, "अरे वो भाषण ऐकने को बहुत जन आते हैं पर वोट २ ही मिळते हैं...", असं म्हणत मनसेली डिवचलं आहे.

कल्पेश घाडी यांनी तर मनसेला थेट, "मनसे हिंदीमय कधी झाली?", असा सवालच विचारला आहे.

संजय चव्हाण यांनी, "खळ्खट्याक करताना एकट्यालाच चोपता ना.." असं म्हणत टीका केली आहे.

संतोष जाधव यांनी तर, "सरकारने आज बिहार,युपी व बंगालला ही मागे टाकलं....", असं म्हणत टीका केली आहे.

तर रविंद्र गावडे यांनी टिका करताना बाळ ठाकरेंनी मातोश्रीवर नमाज पठणाला दिलेल्या परववानगीची आठवण करून देताना म्हटलं आहे, "मातोश्रीवर बाळासाहेबांनी एका मुस्लिम कार्यकर्त्याला नमाज पठण करायला सांगितले होते तेव्हा ते सर्व ठीक आहे पण इथे तर हनुमान चालीसा बोलायची होती तरी पण एव्हढ्या ड्रामा ? हाई व्होल्टेज ड्रामा का कश्यासाठी ?"

याशिवाय अनेक अश्लाघ्य भाषेतील कमेंट्स देखील काही वापरकर्त्यांनी केल्या आहेत ज्या या बातमीत आम्ही आपल्याला सांगूही शकत नाही आहोत. आता मनसेनं केलेलं हे ट्विट बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या म्हणीप्रमाणे तर ठरत नाही ना हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News