Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
रविवार १४ ऑगस्ट रोजी पहाटे माजी आमदार शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अत्यंत भीषण अपघात होता. अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून त्यांचे सहकारीही जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर उपचारच मिळाले नाहीत. ते तासभर गाडीतच पडून होते, असा धक्कादायक आरोप विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अनेकांना हा अपघात नसून घातपात असल्याची देखील शक्यता वर्तवली आहे. माणसे नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील ट्विट करत समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे.. असं ट्विट केलं आहे.
विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कुटुंबियांनीच हा घात-पात तर नाही ना अशी शंका उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे नेमका अपघात झाला कसा? अपघातानंतर रुग्णसेवेला एवढा उशीर का? मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या वेळेत अचानक बदल कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्तित होत असताना सय्यद यांनी ट्विट करत समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने म्हंटले आहे.
समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने.@CMOMaharashtra @DGPMaharashtra
— Deepali Sayed (@deepalisayed) August 15, 2022