मीरा चोप्रा: प्रियंका चोप्राच्या पावलावर पाऊल टाकत, लाल रंगात बनली वधू!
मार्च-एप्रिल-मे या तीन महिन्यात धूम-धडाक्यात लग्न सोहळे पार पडतात. अशातच प्रियंका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा मंगळवारी जयपूरमध्ये रक्षित केजरीवाल याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. 40 वर्षीय मीराने जयपूर-दिल्ली हायवेवरील बुएना व्हिस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले. चर्चा मात्र तिच्या लाल कलरच्या लहेंग्याची, कारण काय आहे ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवट पर्यन्त नक्की बघा...
40 वर्षीय अभिनेत्री मीराने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि उद्योगपती रक्षित केजरीवाल यांच्यासोबत जयपूर-दिल्ली हायवेवरील बुएना व्हिस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले. या लग्नाला बॉलीवूड इंडस्ट्रीतील मीराच्या जवळचे अनेक मित्र उपस्थित होते ज्यात संदीप सिंग, आनंद पंडित, अर्जन बाजवा आणि गौरव चोप्रा यांचा समावेश होता.
अनुष्का शर्माने जेंव्हा लग्न केले तेंव्हा तिने पेस्टल कलरच्या लेहेंग्याचा ट्रेंड आणला आणि बॉलीवूड मधील रकुल प्रीत असो वा कियारा अडवाणी, मग ती अथिया शेट्टी असो वा आलिया भट्ट या सगळ्यांनी हा ट्रेंड फॉलो केला. मीरा चोप्रा ही परिणीती चोप्रा आणि प्रियंका चोप्रा या दोघींची चुलत बहीण आहे. परिणीतीने तिच्या लग्नात पेस्टल लेहेंगा निवडला असला तरीही,मीराने मात्र प्रियंका चोप्राचा मार्ग अवलंबून लाल रंगाचा लेहेंगा निवडला, आणि परिधान केला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काही काळापूर्वी दैनिक भास्करशी बोलताना मीरा लग्नाबाबत मनमोकळेपणाने बोलली होती. ती म्हणाली होती, "मला स्थिर जीवन हवे आहे. मला असा जीवनसाथी हवा आहे जो नेहमी माझ्यासोबत असेल."
मी 15 वर्षांपासून मुंबईत एकटी राहते. याआधी मी माझे करिअर घडवण्यासाठी साऊथमध्ये राहत होते, त्याआधी मी अमेरिकेत शिकत होते. म्हणून, मी एकटे खूप आयुष्य जगले आहे. नक्कीच, हा कोणाच्याही आयुष्यात एक नवीन टप्पा असतो. असं मीरा चोप्रा म्हणाली आहे.
मीरा ने सोशल मिडिया वर फोटो शेअर करून त्याला आकर्षक कॅप्शन लिहिले आहे कॅप्शन मध्ये ती लिहिते- आता कायमचा आनंद, मारामारी, हशा, अश्रू आणि आयुष्यभराच्या आठवणी.. प्रत्येक जन्मी तुझ्यासोबत..
मीराच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा आणि अभिनंदन दिले. एका यूजरने लिहिले - "कोणीतरी आहे ज्याने लग्नात योग्य लेहेंगा घातला होता."