माध्यमांनो सत्य दाखवा, महागाईची झळ तुम्हालाही..

इंधन दरवाढीवर माध्यमांना सत्य दाखवण्याचे आवाहन मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.;

Update: 2022-03-30 13:50 GMT

उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणीपूर या पाच राज्यांच्या निवडणूकांनंतर देशात महागाईची लाट उसळली आहे. निवडणूकांदरम्यान सिलेंडर आणि दुधापासून सुरू झालेली दरवाढ ही आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाशी येऊन थांबली आहे. केंद्र सरकारला या महागाईवरून आता विरोधी पक्ष आणि नेते धारेवर धरू लागले आहेत. पण राष्ट्रीय माध्यमांनी या महागाईबद्दल एक अवाक्षरही काढलेला नाहीये.

यात राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आता माध्यमांना आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्या त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हणतात, "इंधनाच्या वाढत्या किंमती आणि महागाई हा चिंतेचा विषय आहे. केंद्रातील सरकारने पीआर कार्यक्रमांच्या बाहेर येऊन लोकांचे प्रश्न पाहिले पाहिजेत. माझी भारतातील सर्व माध्यमांनाही विनंती आहे की त्यांनी सत्य दाखवावं, महागाईच्या झळांपासून तुम्ही ही दूर नाहीत."

Tags:    

Similar News