राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना मागील आठवड्यात कोव्हीडची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. अशी माहिती स्वतः यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून सांगितली आहे. पण रुग्णालयाचं नाव मात्र त्यांनी उघड केलेलं नाही.
यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे,"कोविडची लागण झाल्यानंतर माझ्या तब्येतीत आज बरीच सुधारणा झाली. मी ठरवून शासकीय रूग्णालयात सर्व उपचार घेतेय. शासकीय रूग्णालयांमध्ये नेहमीच चांगले उपचार केले जातात. लोकप्रतिनिधी-अधिकारी यांनी शक्य तितकं शासकीय रूग्णालयांचा वापर केला पाहिजे. #COVID19 #Omicron
कोविडची लागण झाल्यानंतर माझ्या तब्येतीत आज बरीच सुधारणा झाली. मी ठरवून शासकीय रूग्णालयात सर्व उपचार घेतेय. शासकीय रूग्णालयांमध्ये नेहमीच चांगले उपचार केले जातात. लोकप्रतिनिधी-अधिकारी यांनी शक्य तितकं शासकीय रूग्णालयांचा वापर केला पाहिजे. #COVID19 #Omicron
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 4, 2022