संगमनेरमधे हजारो महिला कोरोना योध्यांचा सन्मान, मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री यशोमती ठाकुर यांची उपस्थिती

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी ज्या महिला आशासेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांनी कां केलं अशा हजारो महिला कोरोना योध्द्यांचा सन्मान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

Update: 2022-03-13 12:55 GMT

संगमनेर मधे आज कोरोना संकटात काम करणाऱ्या आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका तसेच आशासेविका यांचा कौतुक सोहळा एकविरा फांऊडेशनकडून संपन्न झाला. या कार्यक्रमाला हजारो आशासेविका व आरोग्यसेविका यांनी हजेरी लावली होती. यावेळी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना एकविरा फाऊंडेशनकडुन भेटवस्तु देण्यात आल्या. या कार्यक्रमाला राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात,नगरअध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.

"पाच राज्यात काँग्रेसचा पराभव झाला याचे विचार मंथन काँग्रेसला करावे लागेल. आमचे नेवृत्व कुठेच कमी पडत नाहीये. कार्यकर्त्यांना पुन्हा तळागाळात जाऊन काम करावे लागेल असे प्रतिपादन काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधे दिले आहे." याशिवाय "सध्याचे राजकारण हे सुडाचे राजकारण होत असून इडीसारख्या संस्थाचा वापर राजकारणात होत आहे यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. हे कुठे तरी सुधारले पाहिजे. सर्वसामान्यांचे जीवनमान हे सुधारले पाहीजे. काँग्रेस कुटुंब हे देशासाठी बलिदान देणार कुटुंब आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी राजीनाम द्या हे म्हणणारे कोण आहेत हे तपासुन पाहणं महत्वाचे आहे," असे काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News