मसाला किंग या नावाने प्रसिद्ध असलेले MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन झाले. ते 98 व्या वर्षाचे होते. त्यांच्यावर माता चंदादेवी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्याच वर्षी धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं.
धरमलाल यांचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला. देशाच्या फाळणीदरम्यान 1947 नंतर त्यांचे वडील दिल्लीत येऊन स्थायिक झाले. 60 वर्षांपूर्वी धरमपाल एमडीएचमध्ये रुजू झाले. ग्राहकांना कमीत कमी पैशांत गुणवत्तापूर्ण मसाले मिळावे या प्रेरणेतून त्यांनी काम सुरू केलं. यानंतर त्यांनी हळू हळू दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमधली दुकानं विकत घेतली. कुटुंबानं पै न पै जोडून व्यापार वाढवला. सुरुवातीला मसाले दळण्याचं काम घरी व्हायचं पण व्यापार वाढल्यानंतर आता पहाडगंजच्या मसाला गिरणीमध्ये मसाले दळले जातात.
काही वर्षांपुर्वी माध्यमांमध्ये MDH वाले बाबा गेले म्हणून बातमी आली त्याच दिवशी रात्री MDH वाले बाबा गेल्याची बातमी खोटी होती म्हणून दूसरी बातमी प्रसिध्द झाली. माध्यमांतील या गोंधळलेल्या स्थितीवर मीमर्सने मात्र चांगलाच कंटेंट म्हणून वापर केला. अनेकांनी महाभारतातील अश्वत्थामा या पात्राशी त्यांची तुलना केली. तर काहिंनी अंत्यविधीला नाचणारे ते काळ्या सुटबूटातील लोक गेले पण हे बाबा नाही असेही मिम्स तयार केले.
मीमरसाठी अमरतेच प्रतिक असलेले MDH मसालेवाल्या आजोबांचे निधन धरमपाल गुलाटी यांच्या आठवणीत असेच काही मिम्स..