'कॉन्ट्रॅक्ट तुझ्या बापाला दिला'; महापौर किशोरी पेडणेकरांचा ट्विट व्हायरल

यावरून पेडणेकरांवर टीका सुद्धा होत आहे

Update: 2021-06-03 03:11 GMT

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून प्रश्न विचारणाऱ्या एकाला उत्तर देताना अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा, स्क्रिन शॉट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच यावरून पेडणेकरांवर टीका सुद्धा होत आहे.

मुंबईकरांच्या 1 कोटी लसींसाठी 9 कंपन्या सरसावल्या असल्याची बातमी पेडणेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या पोस्ट खाली मिथि रिवर (mithi river) नावाच्या व्यक्तीने या लसिंच कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं,असा प्रश्न विचारला. या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या की, 'तुझ्या बापाला दिला',




 पेडणेकरांच्या ट्विटचा हा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर त्यांच्या ट्विटवर अजूनही मिथि रिवर नावाच्या व्यक्तींने विचारलेला प्रश्न दिसून येत आहे, मात्र त्याखाली केलेली कमेंट डिलीट करण्यात आल्याचं सुद्धा दिसत आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेली पोस्ट खरी की खोटी अजून स्पष्ट होऊ शकले नाही.


Tags:    

Similar News