शाळेचे शिक्षक म्हटलं की कुणाच्याही अगदी सहज डोळ्यासमोर येतं ते चांगला पगार, नेहमी आरामात निवांत काम करणारी व्यक्ती. काही शिक्षकांचे तर वर्गात झोपलेले फोटो व्हिडीओही व्हायरल झालेली अनेकांनी पाहिली असतील. पण याचा सर्वच शिक्षक असे असतात असा होत नाही. लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्या. उपाय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात केली. यात खरा प्रश्न निर्माण झाला तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा. अशावेळी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पुढं आले ते हेच शिक्षक. अशाच शिक्षकांच्या कार्याला सलाम करणारे max woman चे संडे स्पेशल बुलेटीन...
जळगावच्या एरंडोल तालुक्याजवळचं गालापुर हे एक अगदी छोटसं गाव. याच गावात डोंगरावर ही आदिवासी वस्ती आहे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांकडे रहायला साधी पक्की घरं नाहीत तर शिकायला मोबाईल कुठून येणार... अशावेळी इथल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला आल्या सरस्वतीच्या उपासक जयश्री पाटील.... कोण आहेत या जयश्री पाटील चला पाहूयात
https://www.maxwoman.in/videos/the-untold-story-of-real-teacher-jayashree-patil-६१६६४२
ऑनलाईन नव्हे ऑन वॉल शाळा !
लेकीसाठी आई बनली शिक्षिका; ब्रेन लिपीचे घेतले शिक्षण
कोरोना संकटात दिव्या बनली गावातील मुलांची सावित्री
'हर बच्चा सुरक्षित रहे' अंगणवाडी सेविका बनवतायत चिमुकल्यांसाठी मास्क