max woman impact: 'त्या' अत्याचाराच्या घटनेप्रकरणी चौकशी करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश

Update: 2021-07-30 15:27 GMT

कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योध्यांचा एकीकडे सन्मान करण्यात येतोय, तर दुसरीकडे मात्र कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या मुलीला अत्यचार झाल्यावर सुद्धा न्याय मिळत नसल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात समोर आले होते. तर अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वतः उपोषणाला बसावे लागले होते. याविषयी max woman ने गुरवारी वृत्त दाखवले होते. त्यांनतर आता धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणा-या पीडित मुलीवर गेवराईतल्या एका नराधम मुलाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलगी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिचं ऐकून न घेता आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप पीडित मुली कडून करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाली असली तरी यातील आरोपीचं समर्थन करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीसह वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली होती.


पडीत मुलीची व्यथा max woman ने दाखवत "धनंजय मुंडेच्या जिल्ह्यात चाललंय काय; अत्याचार झालेल्या मुलीवर न्यायासाठी उपोषणाला बसण्याची वेळ", असा प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यांनतर याची दखल धनजय मुंडे यांनी आता पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे max woman च्या बातमीमुळे पिडीत मुलीला न्याय मिळू शकणार आहे.

Tags:    

Similar News