आज रवींद्र नाट्य मंदिर येथे गगनभरारी घेतलेल्या महिलांची यशोगाथा | MaxWoman Conclave

मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये गगनभरारी घेतलेल्या महिलांची यशोगाथा;

Update: 2023-05-05 05:17 GMT

मॅक्स वूमन आयोजित महाचाय प्रस्तुत गगनभरारी घेतलेल्या महिलांकडून त्यांची यशोगाथा ऐकण्याची संधी रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी मिळणार आहे.

महिला नेतृत्व म्हणजे फक्त महिलांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या महिला असा त्याचा अर्थ होत नाही. एवढंच नाही तर हा अर्थ आम्हालाही मान्य नाही. त्यामुळे विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची यशोगाथा घेऊन मॅक्स वूमन आयोजित महाचाय प्रस्तुत मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हचे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी या ठिकाणी करण्यात आले आहे.

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सुरुवातीपासूनच महिलांना एक साप्ताहिक पुरवणी किंवा अर्ध्या तासाच्या शो पलिकडे स्थान दिलं नाही. नेमकी हिच विसंगती आम्हाला मान्य नाही. त्यामुळे हिच जाणीव मुळाशी ठेऊन मॅक्स वूमनचा जन्म झाला. याच मॅक्स वूमनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान करण्यासाठी शुक्रवारी सायं. 7.30 वा. रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा मॅक्स वूमन 2023 हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुलभा कोरे, पेनो इंडियाच्या संस्थापक विजया पवार, इंफ्राटेकच्या संचालक अलंक्रित राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर आणि साम वृत्तवाहिनीच्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक यांचा समावेश आहे. या पुरस्कार प्राप्त यशस्वी महिलांची यशोगाथा ऐकण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. याबरोबरच राजकीय क्षेत्रातील आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे आणि कवयित्री आतिका फारुखी यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मॅक्स वूमन आयोजित महाचाय प्रस्तूत मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी केले आहे.

Tags:    

Similar News