Maruti Suzuki; मारुती सुझुकीचा नवा विक्रम, सीएनजी मॉडेलच्या 10 लाख युनिट्सची विक्री
मारुती सुझुकी इंडियाने सीएनजी मॉडेलच्या 10 लाख युनिट्सची विक्री करण्याचा विक्रम केला आहे. तसेच हा टप्पा गाठणारी देशातील ही पहिली कंपनी ठरली आहे. मारुती अल्टो, S-Presso, WagonR, Celerio, DZire, Ertiga, Eeco, Super Carry आणि Tour-S हे CNG मॉडेल्समध्ये खरेदी केले जाऊ शकतात. CNG मधील सर्वोच्च श्रेणी देणारे मॉडेल म्हणजे सेलेरियो. त्याचे मायलेज 35.60km/kg आहे.
मारुतीने 2010-11 मध्ये 15 हजार 900 सीएनजी कारची विक्री केली होती. 2016-17 मध्ये हा आकडा 3.5 लाख युनिट्सवर पोहोचला. त्यानंतर तो आकडा 2018-19 मध्ये कंपनीने 5.3 लाख युनिट्स गाठले. 2020-21 मध्ये 7.98 लाख युनिट्सवर पोहोचले. यानंतर 2021-22 मध्ये कंपनीने 10 लाख युनिट्सची विक्री करण्याचा टप्पा पार केला आहे.