दिल्लीतील निर्भया प्रकरण ( Nirbhaya Incident ) देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला महिला अत्याचाराकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला ३६० अंशातून या प्रकरणाने फिरायला लावलं. निर्भया प्रकरणानंतर देशातील प्रत्येक महिला अस्वस्थ झाली, बाप-भाऊ-पती-प्रियकराच्या रूपातील प्रत्येक पुरूष हादरला. कोणी इतकं क्रूर होऊ शकतं का? हा एकच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
अशा परिस्थितीत दिशा किंवा शक्ती कायदा यामुळे अशा घटनांना ब्रेक लागेल असं सांगण्यात येतं. मात्र लोकांमध्ये पोटतिडकीने भाषण करणारे नेते सभागृहात मात्र कठोर कायद्यांना खीळ घालताना दिसतात. महाराष्ट्रात आणण्यात आलेला शक्ती कायदा सुधारणांसाठी प्रलंबित आहे. निर्भया प्रकरणानंतर ही अनेक कायदे बदलण्यात आले. मग इतकं सगळं असूनही अत्याचार थांबत का नाहीत?,
पाहू यात सरकारचे दावे आणि वस्तुस्थिती सांगणारा हा रिपोर्ट...