'कू अँप' आता हळूहळू चांगलेच लोकप्रिय होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर कू ची विश्वसनीयता वाढत चालली आहे. अनेक लोकांनी या अँपला पसंती दर्शवली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला एक पर्याय म्हणून koo ॲप बनवण्यात आलं होतं. अशा या देशी अँपला सर्वच स्तरातून उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. आज मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीत्याचबरोबर अनेक शासकीय कार्यालयांची सुद्धा अकाउंट या ॲप वरती आहेत.
आता सध्या t20 विश्वचषकाचा रणसंग्राम सुरू होतोय. यामुळे सध्या Koo अँप वरती एक हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. #SabaseBadaStadium हा हॅशटॅग ट्रेंड होताना पाहायला मिळतोय. या सीझनमध्ये भारतीय टीमला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी हा हॅशटॅग वापरत आपलं मत शेअर केले आहे. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद शमी, शेन वॅटसन, मयंती लैंगर, आकाश चोपडा, व्यंकटेश प्रसाद, वसीम जाफर, निखिल चोपडा, विनोद कांबळी, मयंती लैंगर, चेतेश्वर पुजारा, रॉबिन उथप्पा, संजय मांजरेकर अशा दिग्गज क्रिकेटपटूंनी Koo वर भारतीय क्रिकेट संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी #SabaseBadaStadium वापरत मत व्यक्त केले आहे.
#indvpak
#cricketonkoo
#sabsebadastadium
#msdhoni