#MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले होते. त्यामुळे राज्यातील सरकार कोसळणार की टिकणार अशी चर्चा रंगली असतानाच शिंदे गटाने सरकारचा पाठींबा काढल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. दरम्यान शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तर शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या नोटीसीला एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनवाई सुरु आहे नक्की सर्वोच्च न्यायालयात काय चालू आहे पहा...
Live Updates
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे
सुप्रीम कोर्ट - तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाच्या वकीलाला सवाल
शिंदे यांचे वकील – आमदारांविरोधात मारण्याच्या धमक्या दिला जात आहेत.
सुप्रीम कोर्ट : आम्ही पाहिले आहे की नोटिसांना उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे: कौल यांना न्यायालय सांगत आहे
सुप्रीम कोर्ट - तुम्हाला नोटीस कधी बजावण्यात आली?
शिंदेंचे वकील - आम्ही 21 ला नोटीस दिली आहे. त्याच दिवशी आम्हाला नोटीस देण्यात आली. उपसभापतींनी नवीन लोकांची नियुक्ती करू नये, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. त्यावेळी आमचे 35 आमदार होते, आणखी वाढले आहेत.
शिंदेंचे वकील - आम्हाला 22 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. आम्ही बैठकीला गेलो नाही, त्यामुळे आम्ही स्वतः पक्ष सोडला असल्याचे सांगण्यात आले. म्हणूनच आम्हाला अपात्र ठरवले आहे. 23 रोजी उपसभापतींनी आम्ही अपात्र असल्याची नोटीस दिली आणि 48 तासांत उत्तर देण्यास सांगितले. उपसभापतींची ही कारवाई चुकीची आहे.
कोर्ट - तुम्ही म्हणताय की तुम्ही उपसभापतींना 21 रोजी नोटीस दिली आहे. त्यांनी 25 रोजी आपल्याला अपात्रतेची नोटीस दिली, याबाबत उपसभापतींशी का बोलत नाही?
शिंदे यांच्या वकीलांनी 2016मध्ये अरुणाचल प्रदेशबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दिला दाखला
कलम 179 क चा दाखला देत एकनाथ शिंदे गटाच्या वकीलाची मागणी