"मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे या नावाची चर्चा आता महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर संपूर्ण जगभर सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत पक्षातील चाळीसहून अधिक आमदारांसोबत बंड केले आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत 20 पेक्षा अधिक आमदार घेऊन थेट सुरतला पोहोचले. जर जसे दिवस जातील तसतसे शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत गेली आणि आज शिंदे गटाने 40 हून अधिक आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या गटाची कोंडी करायला सुरूवात केली आहे. बंडखोरी केल्याच्या कारणावरून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची निवड केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याविरोधात एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. राज्याच्या राजकारणात या सगळ्या घडामोडी घडत असताना. सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ता मात्र मोठ्या चिंतेत पडला आहे. आता हेच पहा ना कोटक महिंद्रा बँकेच्या कस्टमर केअर मधून एक ग्राहकाला कॉल करण्यात आला. या व्यक्तीचे या बँकेत अकाउंट आहे त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी हा कॉल करण्यात आला होता. पण आपला आमदार गुवाहाटीला गेल्याने काळजीत असलेला हा व्यक्ती " मॅडम मी लंय टेन्शन मध्ये आहे. ते आमचे शिवसेनेचे आमदार पळून गेलेत ना! त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे फोन करू नका." अस म्हणतो आहे.
आता हे ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की, कितीही महत्वाचं काम असुदे आता या व्यक्तीला तर बँकेचा कॉल आला होता पण तरीसुद्धा लोकांना आपल्यापेक्षा आता राजकारणात काय होणार याची चिंता आहे. आपला आमदार कुठे आहे याची त्याला काळजी आहे. हा ऑडिओ आता समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होतं आहे. सध्या या ऑडिओने समाजमाध्यमांवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या ऑडिओ क्लिपची सत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही. ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहे.