शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या युतीनंतर आता सत्तेत असणाऱ्या या सरकारला विरोधी पक्ष नेता कोण असावा ? यावर सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे . आतापर्यंत शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. पण राष्ट्रवादीत बंडखोरी करून अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारला जाऊन मिळाले आणि आता उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ सुद्धा घेतली आहे.
अशावेळी विरोधी पक्षनेता कोण असावा ? यासाठी जनतेची उत्तरे वेगवेगळी आहेत. पण काँग्रेसच्या नेत्यांपैकी विरोधी पक्षनेते पद कोणाला जाईल ?याचा विचार केला असता यशोमती ठाकूर यांना सर्वात जास्त पसंती मिळालेली दिसते.
कोण व्हावा विरोधी पक्षनेता ?
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) July 17, 2023
तिवसा मतदार संघाच्या आमदार आणि माझी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना विरोधी पक्ष नेता म्हणून सर्वात जास्त पसंती दिली जात आहे.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची सुद्धा नावे विरोधी पक्ष नेत्याच्या यादीत घेतली जात आहे.तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं विरोधी पक्ष नेता ? हे कॉमेंट करायला विसरू नका...