करोनाचा वाढता प्रार्दुभाव... काय आहे राज्याची स्थिती?
राज्यात तासाला १६ रुग्णांचा मृत्यू, मिनिटाला ४४ नवे रुग्ण… काय आहे राज्याची स्थिती?
आज राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात राज्यात तासाला १६ रुग्णांचा मृत्यू होत असून मिनिटाला ४४ नवे रुग्ण समोर येत आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे.
आज ४५,३३५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.