अंकल मेरी मा उपर भगवान के पास जा रही है उसका फोटो खीच के लावो: फोटोग्राफरला अश्रू अनावर

Update: 2021-04-16 19:18 GMT

सौजन्य - दैनिक भास्कर

स्मशानभूमीतील चिमणीतून बाहेर पडणारा धूर पाहून एक बहिण भाऊ तेथे गळ्यात कॅमेरा अडकवलेल्या पत्रकाराला सांगतात

''अंकल मेरी मा जा रही है उपर भगवान के पास उसका फोटो खीच के लाओ".

हे दृश्य पाहून युरोपियन फोटो एजन्सी चे फोटो जर्नालीस्ट असलेले संजीव गुप्ता हे त्या दिवशी रात्रभर झोपले नाहीत.

पंधरा एप्रिल रोजी ते भोपाळ येथील स्मशानभूमी परीसरात कवरेज साठी गेले होते. एक सामान्य बातमी मिळेल या उद्देशाने गेलेल्या संजीव गुप्ता यांना त्या स्मशान भूमीच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुरावरून या ठिकाणी जास्त प्रेत जळत असल्याचा अंदाज आला. की ज्यावेळी सरकार फक्त चार प्रेते जळत असल्याचा दावा करत होते.



ड्रोन च्या साहाय्याने पाहिले असता त्या ठिकाणी तब्बल पंचेचाळीस प्रेते जळत असल्याचे त्यांनी पाहिले. ते सांगतात की त्यांच्या आयुष्यात त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटना कव्हर केली पण अशा प्रकारचे भयानक दृश्य त्या काळात देखील त्यांनी पाहिले नाही.

या परिस्थितीत ते कोण दोषी या वादात न पडता परमेश्वराला प्रार्थना करतात की, या स्थितीतून पृथ्वीला लवकर बाहेर काढ. याचबरोबर या स्थितीची जाणीव करून देत लोकांना देखील त्यांनी घरी राहून सुरक्षित रहा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags:    

Similar News