सिलेंडरला घातले हार आणि चुलीवर केल्या भाकरी

गॅसचे दर वाढल्यामुळे महिलांचे महिन्याची आर्थिक गणितांची घडी विस्कळीत झाली आहे .त्याचबरोबर अनेक महिला गॅसच्या बचतीसाठी अनेक उपाय शोधत आहेत .;

Update: 2023-03-04 11:43 GMT

गॅस इतका महाग झाला आहे की आता चुली पेटवण्याची वेळ आली आहे . अशा प्रकारचे आंदोलन नांदेडमध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नांदेड यांच्या वतीने अनेक महिला एकत्र आल्याआहेत . त्यांनी गॅसच्या सिलेंडरला हार घातला आणि त्यावर तवा ठेवला आहे आणि भाकरी थापण्यास सुरुवात केली.

गॅसने नक्की कितीने वाढला आहे ?

नुकतेच केंद्र सरकारने गॅसची दरवाढ केली आहे . त्यामुळे स्वयंपाकासाठी गृहिणींना गॅस आता मात्र परवडेनासा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नांदेड जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने चुलीवरच्या भाकरी करून जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले आहे. गॅसभाव असतील तेलाचे भाव असतील या दरात सतत भाव वाढ होत असल्या कारणाने हा दर नागरिकांना परवडेनासा झाला आहे. पूर्वी गॅसचा भाव 450 होता आज मात्र गॅस चा भाव 1150 रु. झाला आहे. त्याचबरोबर पूर्वी पेट्रोल 55 रु. होते, डिझेल 45 ते 50 रु. होते, आता मात्र पेट्रोल आणि डिझेल चे भाव गगनाला भिडलेले आहेत. पूर्वीची महागाई जास्त आहे या कारणावरून निवेदन देऊन हे सरकार आलं आहे असं हरिहरराव भोसीकर म्हणाले."मोदी सरकार शर्म करो, गृहिणीयों का बोझ कम करो "असं म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने नांदेड जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

गृहिणींच्या जीवनावर याचा परिणाम काय?

गॅसचे दर वाढल्यामुळे महिलांचे महिन्याची आर्थिक गणितांची घडी विस्कळीत झाली आहे .त्याचबरोबर अनेक महिला गॅसच्या बचतीसाठी अनेक उपाय शोधत आहेत . काही उपाय हे यांच्या रोजच्या जीवनात अडचणीचे सुद्धा ठरू शकतात .ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर जेवण करण्यास सुरुवात करत आहेत . त्यामुळे महिलांचं स्वास्थ्य पुन्हा धोक्यात येऊ शकते . त्यामुळे केंद्र सरकारने गॅस दरवाढ कमी केली ,तर नक्कीच गृहिणींना या परिस्थितून मार्ग काढता येईल .पण असे होईल का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे .

Tags:    

Similar News