डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 2 हजारकरून पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा झटका दिला आहे. बुधवारपासून देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या या निर्णयानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2 हजार 101 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2 हजार 51 रुपयांचा झाला आहे.
त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २ हजार १७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २ हजार २३४ रुपये मोजावे लागणार आहेत.. गेल्या महिन्यात ही किंमत 2000.50 रुपये होती. मात्र, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमुळे रेस्टॉरंट आणि बाहेरील खाद्यपदार्थ आता महाग होऊ शकतात.