आज म्हणजेच १ एप्रिल रोजी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 92 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर मुंबईत गॅस सिलेंडरचा दर हा १ हजार १९० रुपये इतका झाला आहे. व्यवसाईक गॅस किंमत कमी झाली असली तरी घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलो गॅस सिलिंडरचा दर गेल्या महिन्याइतकाच आहे.
मागच्या महिन्यात गॅसचे भाव काय होते?
यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर त्याची किंमत दिल्लीत 2 हजार 119.50 रुपयांवर पोहोचला होता. त्याच वेळी, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची किंमत 1 हजार 103 रुपये झाली आहे. (प्रत्येक शहरातील किंमती वेगवेगळ्या आहेत)
जून 2020 पासून सबसिडी बंद..
जून 2020 पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. आता उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना सिलिंडर देण्यात आले आहे त्यांनाच 200 रुपये अनुदान मिळते. यासाठी सरकार सुमारे 6 हजार 100 कोटी रुपये खर्च करते. जून 2020 मध्ये, दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडर 593 रुपयांना मिळत होता त्याची आता 1 हजार 103 रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे.
प्रमुख शहरांमध्ये गॅसच्या किंमती काय आहेत?
कमर्शियल गॅस किंमत..
मुंबई - 1 हजार 80
दिल्ली - 2हजार 28
कोलकत्ता - 2 हजार 132
चेन्नई - 2 हजार 92
महाराष्ट्रातील विविध शहरात घरगुती गॅसची किंमत काय आहे..
मुंबई 1 हजार 102
अहमदनगर 1 हजार 116
अकोला 1 हजार 123
अमरावती 1 हजार 136
औरंगाबाद 1 हजार 111
भंडारा 1 हजार 163
धुळे 1 हजार 123
गडचिरोली 1 हजार 172
जळगाव 1 हजार 108
कोल्हापूर 1 हजार 105
लातूर 1 हजार 127
नागपूर 1 हजार 154
नांदेड 1 हजार 128
नाशिक 1 हजार 106
उस्मानाबाद 1 हजार 127
पुणे 1 हजार 106
सांगली 1 हजार 105
प्रमुख मोठ्या शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती काय आहेत?
मुंबई 1 हजार 102
दिल्ली 1 हजार 103
कोलकत्ता 1 हजार 129
चेन्नई 1 हजार 118
जयपूर 1 हजार 106
पटना 1 हजार 201
रायपूर 1 हजार 174
भोपाळ 1 हजार 108
जयपूर 1 हजार 106