देशाचं लक्ष लागलेल्या आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइनचा महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पराभव झाला आहे.
लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे.त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे.