लातूरला पहिल्यांदाच मिळाल्या महिला जिल्हाधिकारी

Update: 2023-07-22 08:04 GMT

लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत जिल्हाधिकारी म्हणून कुठल्याही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती. लातूरमध्ये जर पाहिलं तर याआधी जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर एका महिलेची नियुक्ती झाली होती. शामला शुक्ला यांनी सीईओ म्हणून 1998-99 या वर्षात कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच लातूरच्या जिल्हाधिकारी म्हणून एक महिला कार्यभार सांभाळणार आहे. नुकतेच लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याच्या पहिला महिला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर घुगे पदभार स्वीकारतील तर लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांची बदली नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.

Tags:    

Similar News