लता मंगेशकर: विक्रमांची राणी आणि स्वरसाम्राज्ञी

लता मंगेशकर यांनी आजतागायत 36 भाषामध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली असून, एवढी गाणी गाणाऱ्या त्या बॉलीवुड मधल्या पहिल्या गायिका तर आहेत.

Update: 2024-02-06 08:07 GMT

भारताच्या गानसम्राज्ञी गानकोकिळा म्हणून गौरवलेल्या लता मंगेशकर यांचं नाव संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे इतिहासात कोरलं गेलं आहे. पण फक्त मधुर आवाज आणि गाणीच नाही, तर अनेक विक्रमांची देखील त्यांनी नोंद आपल्या नावावर केली आहे. आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांच्या काही विक्रमांबद्दल जाणून घेऊया. सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम लता मंगेशकर यांच्या नावे आहे. लता मंगेशकर यांनी आजतागायत 36 भाषामध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली असून, एवढी गाणी गाणाऱ्या त्या बॉलीवुड मधल्या पहिल्या गायिका तर आहेत. लता मंगेशकर यांचा हा रेकॉर्ड गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नमूद आहे. हा त्यांचा विक्रम अजूनही कोणत्याही गायकाने तोडलेला नाही.

लता मंगेशकर यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत ही त्यांची गायिकेतली जादुगिरी असल्याच म्हटल जात. त्यांच्या हयातीत त्यांनी 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत, हे त्यांच्या बहुभाषिक प्रतिभेच उत्तम उदाहरण आहे. जगात एवढ्या भाषांमध्ये गाणी गाणारा इतर कोणी गायक नाही. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. या पुरस्काराची मानकरणी असणाऱ्या लता मंगेशकर यांना चार वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर पुरस्कारांच्या संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार सुद्धाचार वेळा मिळाला आहे.

भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार १९८९ मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला असून त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार सुद्धा 2001 साली मिळाला आहे . हे फक्त काही मुख्य विक्रम आहेत. त्यांना जगभरातून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले असून त्यांचं नाव हे प्रतिभा, समर्पण आणि संगीतावरील अढळ प्रेमाचं प्रतीक असल्याच म्हटल जात. त्यांचा मधुर आवाज आणि गायनाची जादू अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या मनात आणि हृदयात गुंजत राहतात. लात मंगेशकर यांची गाणी आजही आजच्या तरुणाईच्या ओठावर आहेत.

Tags:    

Similar News