सीमाडोह-माखला रस्त्यावर दरड कोसळली; रस्त्याअभावी गर्भवती महिलांचे उपचार थांबले

मेळघाटात परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे मेळघाटातील सेमाडोह- माखला व चुनखडी मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला आहे

Update: 2021-07-26 08:08 GMT

मेळघाटात परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे मेळघाटातील सेमाडोह- माखला व चुनखडी मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास दीड किलोमीटर पर्यंत ही दरड कोसळल्याची माहिती समोर आल आहे. त्यामुळे या मार्गावरील विस्कळीत झाली आहे. तर रस्त्याअभावी गर्भवती महिलांचे उपचार थांबले असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.

दरड कोसळल्याने माखला, बिच्छुखेडा व माडीझडप हे तीन गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेली दरड तातडीने हटवण्याची गरज आहे. गावाचा संपर्क तुटल्याने गावामधील दोन गर्भवती महिलांना उपचारासाठी जाता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्याअभावी या महिलांचे उपचार थांबले आहेत. हा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी पुर्ववत करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल , झाडे , दगडांचा मोठा खच पडला आहे. त्यामुळे एक आठवड्यापेक्षा काळ या मार्गावरील साचलेला चिखल व दरड हटवण्यासाठी लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तब्बल दीड किलोमीटर रस्त्यावर माती- दगड आल्याने या ठिकाणी आवश्यक यंत्रणा पोहचण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

Tags:    

Similar News