नागपूरात एका महिला डॉक्टरने ४ विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. आकांक्षा अमृत मेश्राम असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. एमबीबीएस, एमडी केल्यानंतर २०१७ मध्ये आकांक्षाचे लग्न झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा मेश्राम हिचे वडील शासकीय नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तर भाऊ बंगळुरूमध्ये नोकरी करतो. आई एलआयसीमध्ये नोकरी करत आहे. उच्चशिक्षित असलेल्या मेश्राम कुटुंबातील मोठी मुलगी आकांक्षा हिने परिश्रम घेऊन एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केलं होतं.
सोलापुरातील शासकीय रुग्णालयात ती नोकरीवर होती. तिने कुटुंबीयांच्या संमतीने लग्न केले. परंतु, काही वर्षांनंतर संसारात कटुता आल्याने दोघांच्याही सहमतीने घटस्फोट घेऊन दोघे वेगळे राहू लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आकांक्षा सोलापुरातून नागपुरात राहायला आली. नागसेन नगरमधील वडिलांच्या घरी पहिल्या माळ्यावर ती राहत होती.
दरम्यान, कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे आकांक्षा नागपुरात परतल्या. जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर त्या राहू लागल्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. हि नोट पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधीत आत्महत्या ही नैराश्यातून केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.