स्वतंत्र अबोली रीक्षा स्टँड हवाच! महिला रीक्षा चालकांची प्रशासनाकडे मागणी

Update: 2021-12-16 13:13 GMT

शासनाकडून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अबोली रिक्षा सुरू करण्यात आल्या .या माध्यमातून महिला रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण रिक्षा साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले .महिलांनी रिक्षा खरेदी देखील केल्या मात्र रिक्षा थांब्यावर तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याने महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अबोली रिक्षा संघटनेने आता कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अबोली रिक्षांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टॅंड उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण आरटीओ कडे केली आहे

कल्याण डोंबिवली मध्ये धावत आहेत 20 अबोली रिक्षा

मात्र कल्याण डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशी घेण्यासाठी रिक्षा स्टँड वर रांगेत तास दीड तास उभे राहावे लागते , त्याच प्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे भाडे देखील त्या प्रमाणात मिळत नाही परिणामी उत्पन्न नसल्याने रिक्षासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे व घर कसे चालवायचे असा सवाल महिला रिक्षा चालकांनी उपस्थित केला त्यामुळे स्टेशन परिसरात अबोली रिक्षा साठी स्वतंत्र रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण डोंबिवली अबोली रिक्षा चालकांनी केली आहे

Tags:    

Similar News