#Bullibai प्रकरणी कुमकुम बिनवाल यांनी महिला पत्रकारांवर केली टीका..

Update: 2022-01-05 10:49 GMT

 सध्या देशभरामध्ये Sullie Deal आणि Bulli bai प्रकरण खूप चर्चेत आहे. या प्रकरणात ॲपवर Bulli bai नावाने अनेक मुस्लिम समाजाच्या महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावली जात असे. या याप्रकरणी आता महिला पत्रकार कुमकुम बिनवाल यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या सर्व महिला वृत्तनिवेदिकांवर टीका केली आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.

त्या म्हणतात, "जवळ प्रत्येक चॅनलचा मुख्य चेहरा एक महिला निवेदिका आहे. परंतू Bulli Deal प्रकरणी शो करणं सोडा देशातील मुलींना deal of the day सांगणारं साधं ट्विटही केलेलं नाही. अजुनही कुणाला काही शंका आहे का?"

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक महिला नेत्यांनी त्यावर टीका करत आणि संबंधितांवर कारवाईची मागणी देखील केली होती. या ॲप मध्ये मुस्लिम महिला, मुस्लिम पत्रकार, मुस्लिम नेत्या यांची बोलू लावली जात असे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे आरोपी ऐन विशी त्ते तिशीतील तरूण आहेत.

कोण आहेत कुमकुम बिनवाल?

कुमकुम बिनवाल या ABP न्यूजसाठी निवेदिका म्हणून काम करत होत्या. सध्या सुरू असलेली माध्यमांची गळचेपी पाहता त्यांनी नोकरी सोडून हिंदूस्तान न्यूज हे यु ट्यूब चॅनल जॉइन केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे

Tags:    

Similar News