सध्या देशभर बुल्ली बाई प्रकरण खूप गाजतंय. याच प्रकरणावरून आता साम टीव्ही न्यूज आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या मध्ये नवा वाद सुरू झाला आहे. नेमका हा वाद काय आहे हे पाहुयात. त्यासाठी आपल्याला आधी बुल्ली बाई हे प्रकरण नेमकं काय आहे हे थोडक्यात पहावं लागेल.
काय आहे बुल्ली बाई प्रकरण?
गिटहब नावाचं एका ऍपवर बुल्ली बाई नावाने अनेक मुस्लिम महिलांची बोली लावली गेली. हे प्रकरण शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतूर्वेदी यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. सर्व स्तरांतून या प्रकरणाची त्वरीत चौकशीची मागणी करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात सुरूवातीला महत्वाची पावलं टाकत बंगळुरूमधून 21 वर्षाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. देशभरातील पोलिसांकडून या प्रकरणी आतापर्य़ंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडून देखील या प्रकरणातील आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
साम टीव्ही न्युज ने काय बातमी लावली?
साम टीव्ही ने बुल्ली बाई प्रकरणातील अपडेट दिले आणि चित्री वाघ बुल्ली बाई प्रकरणी शांत का असा प्रश्न उपस्थित केला.
याशिवाय त्यांनी चित्रा वाघ यांचे फेसबूक आणि ट्विटर अकाउंट दाखवत त्यावर कुठेही कोणतीही प्रतिक्रीया अद्याप बुल्ली बाई प्रकरणावर दिलेली नाही हे दाखवले आणि चित्रा वाघ या धर्म बघून टीका किंवा प्रतिक्रीया देतात का? असा सवाल उपस्थित केला.
चित्रा वाघ सामच्या या बातमीवर काय म्हणाल्या?
आज पत्रकारदिन पण #saamTVnews आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा विसर पडलाय का..असा प्रश्न पडतोय
मी कालच पुण्यात या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया दिलीये त्यावेळेस इतर चॅनेल्स सोबतचं साम TV ची रिपोर्टर ही उपस्थित होती तरीही महिलांच्या कार्याला धर्मात विभागणारी बातमी खोडसाळपणे करण्यात आलीये…
नवी मुंबईतील घटनेत FIR मध्ये साम TVतील एका व्यक्तीचं नाव घेतलं गेलयं त्यांवर चॅनेलचे संपादक प्रसन्न जोशी यांनी काय कारवाई केली हे दाखवून द्यावं या प्रकरणात साम चॅनेल गप्प का आहे याचं उत्तर द्यावं..
दुटप्पीपणे वागण्यापेक्षा आपण दर्पणकारांचा वारसा पुढे नेत असल्याचं सिद्ध करावं..
या शब्दात सामवर टीका करणारी पोस्ट त्यांनी फेसबूक वर अपलोड केली.