किचन महागल ; गहू, तांदूळ, तूरडाळ किंमतीत वाढ

Update: 2023-08-24 07:23 GMT

महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसव्या लागत आहेत. गहू तांदूळ, तूरडाळ भाजीपाला आणि किराणाही गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या स्वयंपाक गृहाच नियोजन बिघडलं आहे. जून महिन्याच्या तूलनेत स्वयंपाक घराचा खर्च २० टक्क्यानी वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतींत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. महागाईमुळे खर्च परवडत नसल्याने हॉटेल तर दुर घरचा खर्चही आता आवाक्याबाहेर चालल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांकडून येत आहे.

दरम्यान कांदा २० टक्के, तूरडाळ १३ टक्के, चणाडाळ १० टक्के, तर मसूर डाळ १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गहू १० टक्के आणि तांदूळ १० टक्क्यांनी वाढल्याने या महागाईची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे

Tags:    

Similar News