कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून 14 फेब्रुवारी पर्यंत संरक्षण दिलं आहे.
कोरोना काळातील बॉडी बॅगांची जास्त किमतीत खरेदी करून त्या माध्यमातून वैयक्तिक लाभ मिळविल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. आपली अटक टाळावी यासाठी किशोरी पेडणेकर यांनी आपले वकील राहुल आरोटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जाणण्यासाठी अर्ज दाखल केला होता पण या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे तोपर्यंत किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध कोणतेही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.