करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Update: 2021-09-06 09:13 GMT

बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्या आलं.

दरम्यान शर्मा यांनी आपल्या गाडीत एक अनोळखी महिलेने पिस्तुल ठेवत आपल्याला अडकवल्याचे म्हटले होते. आपल्या जीवाला करुणा शर्मा यांच्यापासून धोका असल्याचे या आधीच धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.दरम्यान मुंडे यांचे समर्थक करुणा शर्मा बीडमध्ये येणार असल्याचे म्हटल्यावर रस्त्यावर उतरले होते.

Tags:    

Similar News