आजकाल करिश्मा कपूर तिच्या आगामी चित्रपट 'मर्डर मुबारक' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात एका मुलाखतीमध्ये 90 च्या दशकातील चित्रपटांबद्दल बोलतांना करिश्मा कपूर भावुक झाली आहे. काय आहे कारण तर चला जाणून घेऊया.
अंगामी काळात करिश्मा कपूर 'मर्डर मुबारक' चित्रपटात तसेच 'ब्राउन' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. करिश्माने 'ब्राउन' बद्दल बोलताना म्हटलं आहे की, "या सीरिजमध्ये माझं व्यक्तिरेख सामान्य नायिकेचं नाही. हे असं व्यक्तिरेख आहे जे खूप असामान्य आणि वेगळं आहे." करिश्मा म्हणते, "ही एका अशा महिलेची कथा आहे जी अत्यंत कच्ची आणि वास्तववादी आहे. तिने खूप काही सहन केलं आहे. कथेतील महिलेला मारहाण झालेली आहे, तिने आपल्यामध्ये चालणाऱ्या भावनांच्या वादळाचा अनुभव घेतलेला असून, ही सीरिज एक क्राइम-ड्रामा आहे. पण त्यापेक्षाही जास्त ती त्या महिलेच्या प्रवासाबद्दल आहे."
करिश्मा कपूर 90 च्या दशकाची आठवण करत म्हणते, "90 च्या दशकात मी माझ्या मनाचं ऐकलं आणि चित्रपट निवडले. त्यावेळी आम्ही सगळे फक्त काम करायचो. हिशेब-किताब ठेवत नासायचो. आम्ही ऊर्जा आणि उत्साहाने पुढे जात होतो. मी कधीही कुठले ही गणित केले नाही, की जर मी हे गाणं केलं, जर मी हा चित्रपट केला तर काय होईल. करिश्मा म्हणते आम्हाला सांगणारे आणि सल्ला देणारे कोणीही नव्हते. ना PR टीम होती आणि नाही स्टायलिस्ट. आम्ही फक्त सेटवर राहायचो आणि चित्रपटांमध्ये काम करायचो."
मुलाखती दरम्यान करिश्मा कपूरला विचारण्यात आलं की कोणत्या चित्रपटामुळे तिच्या आता आयुष्यात बदल आला आहे? यावर करिश्मा म्हणाली, "ईमानदारीने सांगू तर, मला वाटतं 'हीरो नंबर 1' मुळे व्यावसायिकरित्या तो बदल आला. 'हीरो नंबर 1' नंतर मी आमिर खानसोबत 'राजा हिंदुस्तानी', शाहरुख खानसोबत 'दिल तो पागल है' सारखे चित्रपट केले. म्हणून मी वैयक्तिकरित्या 'हीरो नंबर 1' लाच बदल घडवून आणणारा चित्रपट मानते." या मुलाखतीमध्ये बोलतांना स्वत:च्या भूतकाळाची आठवण करत करिश्मा भावुक होतांना दिसली आहे.