कपूर कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Update: 2024-12-11 11:51 GMT

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जयंतीनिमित्त कुटुंबीयांनी खास सोहळ्याचे नियोजन केले आहे. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर करीना कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पंतप्रधानांनी करिनाच्या मुलांसाठी खास भेट देखील दिली आहे.

कपूर कुटुंबातील करीना कपूर, नीतू कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि बरेच लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी तैमूर-जेहसाठी दिलेल्या भेटवस्तूचा फोटो व्हायरल होत आहे.

जेह-तैमूरला पंतप्रधानांनी कोणती भेट दिली?

या खास भेटीनंतर करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी पीएम मोदी एका कागदावर सही करताना दिसत आहेत. त्याच्यासमोर करीना कपूर दिसत आहे. वास्तविक, या कागदावर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलांचे जेह आणि तैमूर यांची नावे लिहिली आहेत. आणि त्यांच्या नावाच्या खाली पंतप्रधानांनी त्यांच्या नावावर सही केली आहे. करिना कपूर खानने आपल्या मुलांसाठी ही खास भेट मागितली आहे.

ही फोटो शेअर करताना करीना कपूरने कॅप्शन लिहिले आहे की, "राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला आमंत्रित केले होते. त्यांला भेटून खूप छान वाटतं. या विशेष भेटीबद्दल धन्यवाद".

Tags:    

Similar News