आप (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली विधानसभेच्या समितीने अभिनेत्री कंगना राणौतला ( Kangana Ranaut) समन्स बजावले आहे. कंगनाला 6 डिसेंबरला दुपारी 12.00 वाजता समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कंगनाने शीख समाजावर केलेल्या वक्तव्याबाबत हे समन्स जारी करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एक वादग्रस्त विधान केलं होतं. मागील अनेक दिवसांपासून कंगना हे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकतंच त्यांनी देशाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून संपूर्ण देशभरातून सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्यावर टीका केली. हे सगळ घडत असताना पुन्हा एकदा कंगना राणावत यांनी शीख समाजाच्या भावना भडकवणारी पोस्ट समाजमाध्यमावर शेअर केली. या तिच्या वक्तव्याविरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यानंतर आज दिल्ली विधानसभेच्या समितीने कंगना राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यांना आता सहा डिसेंबरला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.