कंगना रणौतचं वरुण गांधीला उत्तर म्हणाली 'जा आता रड'

Update: 2021-11-12 05:47 GMT

अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोकांनी तर तिचा पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

ती या व्हिडीओमध्ये म्हणते..

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. या वक्तव्यावरुन भाजप नेते वरुण गांधी यांनी संताप व्यक्त करत कंगनावर निशाणा साधला होता.

कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.

वरुन गांधी यांच्या या टिकेला कंगनाने इन्स्टाग्रामवर उत्तर दिलं आहे.

"मी म्हटलं आहे की 1857 चे युद्ध ही पहिली क्रांती होती, जी चिरडली गेली, त्यानंतर इंग्रजांकडून आणखी अत्याचार झाले आणि जवळजवळ एक शतकानंतर आम्हाला गांधींच्या भिकेच्या भांड्यात स्वातंत्र्य मिळाले. जा आणि आणखी रड." अशा शब्दात उत्तर दिलं आहे. कंगना राणौतच्या 'आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं.' या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना तिने आता हा वाद वाढवायचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं.

Tags:    

Similar News